हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख नोकऱ्या धोक्यात:आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा, राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी
राज्याच्या विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर नुकतीच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने आणि मांडलेल्या आकडेवारीने मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष…