महेश सूर्यवंशींचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान:दगडूशेठ ट्रस्टचे कोषाध्यक्ष, चार दशके सामाजिक सेवेत सक्रिय
पुणे महानगरपालिकेतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जलसंवर्धन आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रांत त्यांनी चार दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे महापालिकेच्या मुख्य भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. महेश सूर्यवंशी यांनी १९८४ मध्ये…