सिडको बसस्थानकातील अस्वच्छतेवर मंत्री प्रताप सरनाईक संतापले:प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला….