उपाशी मरणाऱ्यांपेक्षा कोण काय खातं यावरच सरकारचं लक्ष:आदित्य ठाकरेंचा नाशिकमधून हल्लाबोल, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
महाराष्ट्रात आज प्रत्येक समाजघटकाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असून राज्य सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील खड्डे, कायदा-सुव्यवस्था, पुण्यात…