Headlines

'सर्वे भवन्तु सुखिनः' हा भारतीय विचार श्रेष्ठ:पुण्यात संघ शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या पाश्चात्य नियमापेक्षा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा भारतीय विचार श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. सध्या जगात ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मुळे अनागोंदी निर्माण झाली असून, या संघर्षाच्या काळात ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा सर्वसमावेशक विचार जगभर नेण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. या…

Read More

आसाममधील एका मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान:बंगालमध्ये मोदींच्या 3 सभा; PM मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडित कुटुंबालाही भेटतील

असममधील श्रीभूमी जिल्ह्यात करीमगंज (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील २३९-बेबीलँड हाय इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा आदेश देण्यात आला आहे. या जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या तीन सभा होणार आहेत. सर्वात आधी…

Read More

कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेबांचा इतिहास वाचा:कुणाल कामराचे मंत्री प्रताप सरनाईकांना मार्मिक प्रत्युत्तर

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबन गीतानंतर सुरू असलेल्या हक्कभंग प्रकरणावरून राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामराला इशारा दिला होता. या इशाऱ्याला कामराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिले असून, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दाखला दिला आहे….

Read More

हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी:डेक्कन पोलिसांनी दोघांना केली अटक; बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी

पुणे शहरात डेक्कन पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या फोनपे खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते. निखील संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय…

Read More

दिल्लीत 50 हजारांचे बक्षीस असलेल्या महिला ड्रग्ज तस्करला अटक:पोलिसांनी 200 CCTV, 100 मोबाईल तपासले; 11 गुन्हे दाखल; गुन्ह्यात मुलींचाही सहभाग

दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथून ‘ड्रग्स क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमला अटक केली. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शाहदरा पोलिसांनुसार, ते दोन महिन्यांपासून कुसुमचा शोध घेत होते आणि गुरुवारी ती शाहदरा येथे आल्यावर पोलिसांनी तिला घेरून अटक केली. माध्यमांना ही माहिती शनिवारी देण्यात आली. तिला अटक करण्यासाठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही आणि 100 हून…

Read More

भागवत कथेच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवा- सुजीत महाराज देशमुख:हातरूण येथे जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजन‎

भागवत धर्मात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा उत्तम संगम आहे. भक्ती, नामस्मरण आणि सत्संगामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो. अहंकार गेल्याशिवाय माणसाला खरी शांती मिळत नाही. कलियुगात भक्तीला “श्रेष्ठ मार्ग’ मानले गेले आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सुजीत महाराज देशमुख यांनी केले. ते बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील जय हनुमान मित्र मंडळ…

Read More

शाश्वत शेती संदर्भामध्ये भाऊसाहेबांना अपेक्षित कार्य पूर्तीस कृषी विद्यापीठ बाध्य:कुलगुरू डॉ. गडाख यांचे प्रतिपादन, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिन साेहळा‎

देशांतर्गत आधुनिक व मुख्यत: व्यावसायिक शेतीच्या पायाभरणीचे शिल्पकार दिवंगत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांचे संकल्पनेतील आत्मानिर्भर ग्रामव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “मॉडेल व्हिलेज” संकल्पना स . डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व कृषी विषयक विकासासाठी कृषी…

Read More

पश्चिम बंगालमध्ये SIR हाच सर्वात मोठा मुद्दा:नवीन मतदार यादीमुळे CM ममतांची चिंता वाढली, 50 जागांवर टीएमसीला अधिक आव्हान

8 एप्रिलच्या सकाळी रिमझिम पावसाच्या दरम्यान, सुमारे सकाळी 10:25 वाजता तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी समर्थकांच्या मोठ्या जमावासह चालतच हरीश चटर्जी स्ट्रीटवरील त्यांच्या घरातून नामांकनासाठी निघाल्या. गोपालनगर सर्वे बिल्डिंगपर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर समर्थक ‘जोतोई कोरो हमला, आबार जितबे बांग्लो’ (कितीही हल्ला करा, बांगला पुन्हा जिंकेल) अशा घोषणा देत होते. तेथे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी माध्यमांना…

Read More

मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.7 रिश्टरचा भूकंप:सकाळीच पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे तीव्र धक्के, नांदेड-परभणीतही जाणवले कंप

मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. भूकंप हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ परिसरात झाल्याची माहिती सर्वप्रथम समोर…

Read More

महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा निर्णय:विभागात 11,512 पदांना हिरवा कंदील; प्रलंबित प्रक्रिया मार्गी लागणार

राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, विभागातील एकूण पदांचा…

Read More