जायकवाडी धरणात आवक कायम; उपयुक्त पाणीसाठा 88 टक्क्यांवर:22 हजार 390 क्युसेक वेगाने पाणी दाखल, मराठवाड्याला दिलासा
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी वरच्या धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत पाण्याची आवक कायम आहे. सोमवारी धरणात २२ हजार ३९० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, सध्याच्या घडीला धरणाचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले असून आज मंगळवारी वरील आवक बघून मुख्य सांडव्याद्वारे…