Headlines

राजकारणातून नाही, भाजपमधून बाहेर पडा:आम्ही तुम्हाला राज्याची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करू; विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना ऑफर

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत काही संकेत दिले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक आणि मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्ण साथ…

Read More

आजपासून आरबीआय एमपीसीची 3-दिवसीय बैठक:रेपो दरात बदलाची शक्यता कमी; 5 ऑगस्ट रोजी निर्णयांची घोषणा

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक आज सोमवार, 3 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. केंद्रीय बँक रेपो दरात कोणताही बदल न करता तो स्थिर ठेवू शकते, असे मानले जात आहे. महागाईचा कल आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 2025 मध्ये चार वेळा 1.25% ची कपात RBI ची मागील बैठक जूनमध्ये झाली…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Controversy

अमित शहा यांनी दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला पण संजय राऊत हे अर्बन नक्षली आहेत म्हणून ते शहा यांना विरोध करत आहे. पण अमित शहा यांना जनतेने निवडून दिले आहे, 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत तुमच्या सारख्या लोकांनी राजीनामा मागितल्याने काही . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित…

Read More

वाघाचा नाद कोल्हा-कुत्र्यांनी करू नये, संजय राऊतांचे तोंड म्हणजे गटार:जयकुमार गोरेंच्या समर्थनात सदाभाऊ खोत आक्रमक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे हे लोकमतातून निवडून आलेले आमदार आहेत. वाघाचा नाद कोल्हा-कुत्र्यांनी करू नये. संजय राऊतांचे तोंड म्हणजे गटारगंगा आहे, त्यात शुद्ध…

Read More

पुण्यात गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला अटक:बिबवेवाडी पोलिसांकडून कारवाई, विषारी दारू जप्त

बिबवेवाडी पोलिसांनी गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली असून, या दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळल्याचे उघड झाले आहे. शीतल सुरेंद्र राठोड (वय 26, रा. कंजारभाट वस्ती, गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई राहुल खाडे यांनी…

Read More

प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र:पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7 हजार कोटी

राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल 94,083 शेतकरी ‘आयकरदाते’ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले असून यामुळे राज्य सरकारचे तब्बल 1,881 कोटी 66 लाख रुपये वाचले आहेत. तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र…

Read More

'NEET'च्या मुद्द्यावर गप्प का? ओमराजे निंबाळकरांनी अखेर मौन सोडले:म्हणाले- ती विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती, ज्याला श्रीकांत शिंदेंनी वाचा फोडली

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळाचे तीव्र पडसाद दिल्लीतील मोठ्या आंदोलनासह संसदेतही उमटलेले पाहायला मिळाले. या गंभीर प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या आरोपावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सातत्याने टीका होत होती. अखेर या टीकेला उत्तर देत निंबाळकर यांनी संसदेतील नेमक्या घडामोडींवर आपले सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. “नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात झालेले आंदोलन…

Read More

हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका:उशिरा येणाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई

हिंगोली शासकीय कामात कसूर करणाऱ्या, विनापरवानगी कार्यालयात उशिरा येणाऱ्या किंवा परस्पर मुख्यालय सोडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चांगलाच दणका दिला आहे. कार्यालयीन शिस्त धाब्यावर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे थेट निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा एका परिपत्रकाद्वारे दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयांमधील काही अधिकारी व…

Read More

विदर्भातून ओबीसींचा एल्गार:'मंडल जनगणना यात्रा' आज भंडाऱ्यातून निघणार; वडेट्टीवार सहभागी, तर पटोलेंची दांडी

जातनिहाय जनगणना तातडीने करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे आणि ओबीसी समाजाला हक्काचे बजेट मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी आज (3 ऑगस्ट) भंडाऱ्यातून ‘मंडल जनगणना यात्रा’ सुरू होत आहे. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा करून 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे समारोप होणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Read More

नाना पटोलेंमध्ये खरंच कोणती दिव्य शक्ती आलीये का?:पाद्यपूजनाच्या व्हायरल व्हिडीओवरून आशिष देशमुखांची टीका

काँग्रेस नेते अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती पटोले यांचे पाय धुताना दिसत आहेत. या कृतीवरून आता नवा वाद पेटला असून, भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी यावरून नाना पटोले यांची थेट ‘भोंदू बाबा’शी तुलना…

Read More