Headlines

5 Students Score 100 Percentile



महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आज, गुरुवारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. एमएचटी सीईटी (MHT-CET) पीसीबी ग्रुपच्या निकालानंतर आता बहुप्रतिक्षित बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीएमएस (BMS), बीबीएम

.

ही सामायिक प्रवेश परीक्षा २८ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ४ सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून एकूण ७१ हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. परीक्षेला विद्यार्थ्यांची उपस्थिती तब्बल ८७.६६ टक्के इतकी लक्षणीय होती.

या विद्यार्थ्यांनी घेतले १०० टक्के गुण

यंदाच्या निकालात ५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. यात ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड आणि थेट राजस्थानमधील जयपूरच्या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे.

अर्जुन ब्रीद – ठाणे

इभाड वेदांत राजेश – पुणे

खिल्ती हेमल शाह – सोलापूर

ओजस उदय पोवार – रायगड

निकेत खत्री – जयपूर (महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी)

विविध प्रवर्गांतील गुणवंतांची यादी

सीईटी सेलने मुख्य निकालासोबतच विविध सामाजिक प्रवर्गांनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘टॉपर’ यादी देखील जाहीर केली आहे.

प्रवर्ग (Category) विद्यार्थ्याचे नाव जिल्हा / राज्य मिळालेले गुण (Percentile)
खुला प्रवर्ग (Open) अर्जुन ब्रीद, खिल्ती शाह, ओजस पोवार ठाणे, सोलापूर, रायगड १०० पर्सेन्टाईल
ओबीसी (OBC) इभाड वेदांत राजेश पुणे १०० पर्सेन्टाईल
एससी (SC) मुद्रा विजय वाघमारे मुंबई उपनगर ९९.८८ पर्सेन्टाईल
एसटी (ST) सुश्रुत जयंत फुलकर नाशिक ९९.९७ पर्सेन्टाईल
एसईबीसी (SEBC) पवार ज्ञानराज दिलीप नांदेड ९९.०८ पर्सेन्टाईल
डीटी/व्हीजे (DT/VJ) ओम प्रवीण पाटील जळगाव ९९.४८ पर्सेन्टाईल
एनटी-सी (NT-C) रश्मिता महेंद्र मडके ठाणे ९९.८५ पर्सेन्टाईल
एनटी-डी (NT-D) प्रथमेश सुदाम दोंड ठाणे ९९.८८ पर्सेन्टाईल
एसबीसी (SBC) अनिका भूषण मुसळे पुणे ९९.९२ पर्सेन्टाईल
एनटी-बी (NT-B) गिरी राजेश कपिल पुणे ९८.४९ पर्सेन्टाईल
परप्रांतीय (OMS) निकेत खत्री जयपूर (राजस्थान) १०० पर्सेन्टाईल

पुढील प्रवेश प्रक्रिया लवकरच

परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा सविस्तर निकाल आणि गुणपत्रिका (Score Card) सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांचे लॉगिन आयडी वापरून गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात. या निकालानंतर आता महाविद्यालयांमधील प्रवेशासाठीची पुढील ‘कॅप’ (CAP) प्रक्रिया आणि त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती सीईटी प्रशासनाने दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *