Headlines

खासदार प्रणिती शिंदेंची मंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस:7 दिवसांत बिनशर्त माफी मागा! अब्रूनुकसानीचा दावा ठोकला




सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून, रस्तेकामाच्या श्रेयवादावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदे यांनी गोरेंना नोटीस बजावली आहे. सातारा जिल्ह्याचे असूनही सोलापूरच्या राजकारणात आपला प्रभाव पाडणाऱ्या जयकुमार गोरेंच्या आक्रमक शैलीची आणि भाषणांची नेहमीच चर्चा होत असते, मात्र यावेळी त्यांच्या एका विधानावर आक्षेप घेत प्रणिती शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या नोटीसच्या माध्यमातून गोरेंनी आपल्या वक्तव्याबद्दल 7 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरमध्ये 7 मे रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रणिती शिंदे सोलापूरमधील रस्त्यांचा विचार न करता दिल्लीतील राहुल गांधींच्या घरासमोरील रस्त्याचा विचार करतात, अशा शब्दांत गोरेंनी केलेल्या टीकेमुळे आपली प्रतिमा मलीन झाल्याचा दावा शिंदेंनी केला असून, त्यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवले आणि ॲड. आर्या राजेभोसले यांनी ही नोटीस धाडली आहे. जयकुमार गोरेंचे विधान द्विअर्थी असल्याचा आरोप मोहोळ-वळसंग रस्त्याच्या श्रेयवादावरून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेली टीका आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोरेंनी केलेले विधान हे द्विअर्थी असून त्यातून प्रणिती शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचली आहे, असा दावा करत त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीही जयकुमार गोरे यांनी खासदारांबद्दल वेळोवेळी केलेल्या काही वादग्रस्त विधानांचा संदर्भ या नोटीसमध्ये देण्यात आला असून, गोरेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट आहे. या कायदेशीर नोटीसद्वारे जयकुमार गोरे यांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यांनी या काळात खासदार प्रणिती शिंदे यांची बिनशर्त माफी मागावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. जर विहित मुदतीत माफी मागितली नाही, तर न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही शिंदे यांच्या कायदेशीर सल्लागारांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता पालकमंत्री गोरे नमती भूमिका घेऊन माफी मागणार की कायदेशीर लढाई लढणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही प्रणिती शिंदेंवर केली होती टीका यापूर्वीही निवडणुकांच्या रणधुमाळीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती; सुशीलकुमार शिंदे यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन वाढवलेली काँग्रेस प्रणिती शिंदेंनी संपवण्याचे काम केले असून, शिंदे साहेबांनी जोपासलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचेही त्यांनी वाटोळे केले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत गोरेंनी त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *