Headlines

नामकर्ण आवारे भोंदू खरातच्या भूखंड व्यवहारांचा 'मास्टरमाईंड':आवारे सध्या पोलिस कोठडीत; पोलिसांकडून सर्वच व्यवहारांचा कसून शोध




भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांतून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाईंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग करण्यात आलेत. ईडीकडून आता या व्यवहारांचा धुंडाळा घेतला जात आहे. समता पतसंस्थेसह सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेही अशीच बोगस खाती उघड झाली आहेत. या पतसंस्थेत खरातशी संबंधित तब्बल 32 खाती उघडण्यात आली. या प्रकरणी या पतसंस्थेचे अध्यक्ष तथा अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या मते, जगदंबा पतसंस्थेतील पैसे अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या नावे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले. त्यासाठी बँकिंग नियमांचे उल्लंघन करण्यात आले. नामकर्ण आवारे याने संबंधित खात्यांसाठी आधार व पॅन कार्ड नसतानाही व्यवहार केले. रिझर्व्ह बँकेने 2 लाखांची मर्यादा ठरवून दिली असताना या खात्यांतून 8 लाखांहून अधिक पैसे वर्ग करण्यात आले. त्यामुळे नामकर्ण आवारे हाच भोंदू अशोक खरातच्या जमीन व्यवहारांचा मुख्य मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. आवारे सध्या सिन्नर पोलिसांच्या 5 दिवसांच्या कोठडीत आहे. अशोक खरातच्या फरार पत्नीची होणार चौकशी उल्लेखनीय बाब म्हणजे कोपरगाव येथील समता व सिन्नर येथील जगदंबा या दोन्ही पतसंस्थांत तब्बल 132 बनावट खाती आढळली आहेत. या खात्यांमधील पैसे प्रामुख्याने जमीन खरेदीसाठी वळवण्यात आलेत. त्यात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व बेनामी व्यवहार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणी खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कल्पना खरात सध्या फरार आहे. त्यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी आहे. हे ही वाचा… केंद्राने महागाईच्या भडक्यात ‘घासलेट’ टाकले:निवडणुकांचा ‘सेल’ संपला, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू, विरोधकांचा घणाघात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *