Headlines

दरेगावात शेतरस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन:अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास




प्रतिनिधी | खुलताबाद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत दरेगाव येथील बोरीचा मळा ते बेंडखोरा शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. बाजार सावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा विकास कापसे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास होत होता. पावसाळ्यात शेतमाल बाजारपेठेत नेणे कठीण होत होते. बियाणे, खते, औषधे, शेती यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचवणेही अवघड होत होते. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजना ही राज्य शासनाची शेतकऱ्यांच्या हितासाठीची योजना आहे. गावातील शेतरस्ते मजबूत करणे हा उद्देश आहे. शेतरस्ते सुकर करणे हा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेती विकासाला चालना देणे हाही उद्देश आहे. या कामामुळे दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. श्रम वाचणार आहेत. आर्थिक खर्च कमी होणार आहे. दळणवळण सुलभ होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा सचिव ज्ञानेश्वर नलावडे, बंडू शिंदे, आनंदा काटकर, भावलाल ढेपले, जगदीश माचवे, तालुका सरचिटणीस शिवाजी गायकवाड उपस्थित होते. तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *