Headlines

शिवराज मोटेगावकर शिक्षण क्षेत्रातील 'माफिया':लातूरमधील क्लासेस मालकाची सुपारी देऊन केली हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा




देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमध्ये अधिक घट्ट होताना दिसत आहेत. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. मात्र, आता या प्रकरणात एका जुन्या हत्या प्रकरणाची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवराज मोटेगावकर यांनीच सुपारी देऊन लातूरमधील ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासेसचे मालक अविनाश चव्हाण यांची हत्या घडवून आणली, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी मोटेगावकर यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. बांगर यांच्या मते, अविनाश चव्हाण यांच्या हत्येनंतर दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये शिवराज मोटेगावकर हाच ‘नंबर एक’चा आरोपी होता. तर गणेश चौगुले हा दुसऱ्या क्रमांकाच आरोपी होता. आर्थिक देवाणघेवाण आणि मोठ्या राजकीय प्रभावाचा वापर करून शिवराज मोटेगावकर यांनी या गुन्ह्यातून आपले नाव बाजूला काढून घेतले. मोटेगावरक शिक्षण क्षेत्रातील माफिया शिवराज बांगर यांनी मोटेगावकर यांचा उल्लेख ‘खाजगी शिकवणी क्षेत्रातील माफिया’ असा केला आहे. त्यांनी असा दावा केला की, मोटेगावकर यांनी केवळ ‘नीट’ किंवा ‘सीईटी’चे पेपर फोडण्याचेच काम केले नाही, तर अनेक लहान-मोठ्या खाजगी क्लासेस चालकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्या पाठीशी मोठे राजकीय पाठबळ असल्यामुळेच ते आतापर्यंत वाचत आले, असेही बांगर म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे फेरचौकशीची मागणी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाची सीबीआयने सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडावी आणि त्या गुन्ह्याची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी शिवराज बांगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मोटेगावकरच्या मुलाचीही CBI चौकशी सुरू दरम्यान, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी मुख्य संशयित शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर, आता सीबीआयने (CBI) त्यांच्या मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यावर्षी बारावीची परीक्षा दिली असून, त्याला फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा थेट फायदा झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, विविध आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक दुव्यांची कसून पडताळणी केली जात आहे. सध्या शिवराज मोटेगावरच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अधिकृत पातळीवर CBI कडून याबाबत कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसेच, तपास सुरू असल्याने चौकशीतील अनेक बाबी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. कोचिंग क्लासेसचे संचालक फरार; प्राध्यापिका निलंबित दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढताच नांदेडमधील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. सत्र संपल्याचे कारण पुढे करत अनेक क्लासेसने आपली कार्यालये घाईघाईने बंद केली आहेत, तर काही संशयित संचालक शहरातून फरार झाले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात पुण्यातून अटक झालेल्या मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्र (Biology) विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. २००२ पासून कार्यरत असलेल्या मांढरे यांचे निलंबन १६ मेपासून लागू करण्यात आल्याचे परिपत्रक कॉलेजने काढले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *