Headlines

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎




अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहर विकास समिती व नागरिकांच्या वतीने कचरा डेपो व खतप्रकल्प इतर जागेत हलविण्यात यावा, याबाबत निवेदन देण्यात आले. शिवनदी संवर्धन योजनेंतर्गत येथील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येणार आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या कचरा डेपो व खतप्रकल्पाला योग्य त्या जागेवर स्थलांतरित करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. शिवनदी परिसरातील स्वच्छता, नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांमुळे संपूर्ण परिसराचे रु प पालटले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रसंगी राजेश कराड, शेखर कुलकर्णी, संदीप उगले, मयूर झांबरे, विकास कोल्हे आदींसह लासलगाव शहर विकास समितीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *