Headlines

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल




कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत होते. या कारवाईत २१ लाख रोख, लॅपटॉप आणि डेटा असा एकूण ३५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स’च्या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे रॅकेट सुरू होते. ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून किंवा बनावट ऑर्डर रद्द करण्याच्या बहाण्याने ‘गिफ्ट कार्ड’ खरेदी करायला लावून ही टोळी पैसे उकळत असे. याप्रकरणी सागर सूर्यवंशीसह १७ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, ४ महिलांचीही चौकशी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वयाची शक्यता या सायबर फसवणुकीचे धागेदोरे थेट अमेरिकेशी जोडले गेल्याने, सातारा पोलिस आता आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांची मदत घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘गिफ्ट कार्ड’ फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *