Headlines

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎



जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव

.

वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात भक्तिरसाचा दरवळ निर्माण केला होता. या भव्य उपक्रमाला अहिल्यानगरमधील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अहिल्यानगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे उपाध्यक्ष राजकुमार जोशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. यजमान प्रसाद कडेकर व अशोक कुलकर्णी यांनी सपत्नीक अग्नी प्रदीपन करून यागाचा प्रारंभ केला. यानंतर प्रायश्चित्त विधी, श्रीगणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, योगिनी मंडल पूजन, वर्धिनी कलश पूजन, भैरव मंडल, रुद्र मंडल तसेच नवग्रह पूजन यांसारखे विविध वैदिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.

यानंतर यजमान चंद्रचूड गोंगले, अशोक कुलकर्णी, राजेंद्र भणगे, अॅड. शिरीष गटणे, अनिलकुमार जोशी आणि निनाद देव यांच्या हस्ते ऋग्वेद हवन, स्थापित देवता हवन, बलिदान, पूर्णाहुती व महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे, दररोज पाच वेगवेगळ्या यजमानांच्या हस्ते ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयाग संपन्न होत होता.

या सोहळ्याप्रसंगी संघाचे अध्यक्ष किशोर जोशी, मयूर जोशी, अमोल कापरे, प्रसाद कुलकर्णी, सागर गोवर्धन, अवधूत भणगे, श्रीकांत जोशी, ओम जोशी, गणेश भालेराव, प्रदीप जोशी घनपाठी, प्रतीक मुळे, आनंद जोशी उपस्थित होते. यागाच्या पूर्णाहुतीनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी राजकुमार जोशी यांनी अथक परिश्रम घेतले. राजकुमार जोशी परिवाराच्या वतीने दररोज अन्नदानाची सेवा करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *