Headlines

दुचाकीला पिकअपची धडक; धोंडे‎जेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार‎:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात‎




सेनगाव शहराजवळ भरधाव‎पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने‎दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना‎शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या‎सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक‎सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण‎येथील रहिवासी होते. दोघे शिक्षक‎धोंडे जेवणासाठी रिसोडला गेले‎होते, परत येताना अपघात झाला.‎ वरूड चक्रपाण येथील शिक्षक‎संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे‎शनिवारी जनगणनेचे कर्तव्य पार‎पाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडे‎भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी‎पाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतर‎दुचाकीने परत सेनगावकडे निघाले‎होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास‎त्यांची दुचाकी सेनगाव शहराजवळ‎आली असताना भरधाव पिकअप‎ चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक‎दिली. या अपघातात दुचाकीवरील‎दोघेही रस्त्यावर कोसळून गंभीर‎जखमी झाले. या अपघाताची‎माहिती मिळताच सेनगाव पोलिस‎ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक‎दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ‎पाटील, रवीकिरण खंदारे, जमादार‎परमेश्‍वर क्षिरसागर यांनी घटनास्थळी‎धाव घेतली. पोलिसांनी दोघांना‎सेनगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.‎मात्र दोघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी‎तपासून मृत घोषीत केले.‎ दोघांच्या पश्चात आई,‎ वडील, मुलगा, मुलगी‎ या अपघातातील मृत दोघे शिक्षक‎आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार‎होते. दोघांच्या पश्‍चात वृद्ध आई,‎वडील, पत्नी, एक मुलगा, एक‎मुलगी असा परिवार आहे. त्यामुळे‎दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर‎कोसळला आहे.‎ ग्रामस्थांना हुंदका अनावर‎ अपघात झाल्याची माहिती‎मिळाल्यानंतर घटनास्थळी धावलो.‎घटनास्थळी पाहणी केली असता‎तेथे रक्तामांसाचा सडा पडला होता.‎पिकअप घटनास्थळी दिसून आले‎तर दुचाकीचा चक्काचूर झाला ‎होता. घटनास्थळावरील चित्र‎पाहिल्यानंतर उपस्थित गावकऱ्यांना‎ हुंदका अनावर झाला.‎ -शरद अदमाने, ग्रामस्थ, वरुड चक्रपाण‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *