Headlines

प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची टीका:म्हणाले- पक्षांतरासाठी विकासकामांचे ढोंग बंद करा; लखाणींच्या उमेदवारीवरही भाष्य




महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून आज अर्ज भरण्यात येणार आहे. यात विशेष लक्ष वेधले गेले ते म्हणजे भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखणी यांना उमेदवारी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. महायुतीमध्ये अनेक नेते बाहेरून येत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, बघा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. आता प्राजक्त तनपुरे, मागची निवडणूक भाजप विरोधात लढले, त्याआधी पण त्यांनी अनेकवेळा भाजप विरोधात निवडणूक लढवली. पण आता भाजपने त्यांना पायघड्या घातल्या. का? ते का गेले? विकासकामे व्हायची आहेत. मग सध्या जे आमदार निवडून आले आहेत भाजपचे ते त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करणार नाहीत? ही ढोंग बंद करा, की आम्ही विकास कामांसाठी पक्षांतर करत आहोत. भाजपने देखील आता काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. अरुण लखाणींच्या उमेदवारीवर काय म्हणाले राऊत? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही लखाणी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, लखाणी जे आहेत हे जन्मजात संघाचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यात आश्चर्यकारक काय आहे? राज्यसभेत असे अनेक लोक आहेत. विदर्भात जे मुळपुरुष आहेत, किंवा पुराण पुरुष आहेत, त्यात लखाणी यांचे नाव आहे. भाजप आणि संघ वेगळे आहे का? पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, अरुण लखाणी बाहेरून आलेले नाहीत. ते आधीच संघाचे होते. भाजप आणि संघ वेगळे आहे का? अरुण लखाणी जर संघाचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत. ती संघटनाच आहे, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे. आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत. आरएसएस म्हणजेच भारतीय जनता पक्ष आहे, वेगळे काय आहेत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *