Headlines

पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीची धाड:माकप कार्यकर्त्यांकडून राजकमल चौकात निदर्शने, केंद्र सरकारवर सूडबुद्धीचा आरोप




अमरावती येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यकर्त्यांनी केरळचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. पिनराई विजयन यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या धाडीविरोधात निदर्शने केली. राजकमल चौकात धरणे आंदोलन करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. माकप कार्यकर्त्यांच्या मते, ही कारवाई राजकीय कटकारस्थानाचा भाग असून, भांडवली धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारने डाव्या विचारांवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे. भाजपने सूडबुद्धीने विजयन यांच्या घरावर ईडीची धाड टाकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कारवाईविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या माकप नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीचाही यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनाची सांगता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीचे सदस्य कॉ. सुभाष पांडे यांच्या समारोपीय भाषणाने झाली. या आंदोलनात जिल्हा सचिव कॉ. रमेश सोनूले, शहर सचिव कॉ. राजेंद्र भांबोरे, कॉ. प्रभाकर आकोटकार, कॉ. मुकुंद काळे, सुनील चव्हाण, जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष आशा वैद्य, सचिव कॉ. पद्माताई गजभिये, सीटू पदाधिकारी कॉ. चंदाताई वानखडे, सदस्य नीलू मेश्राम, ललिता वासनिक, सीटू संलग्न संघटना पदाधिकारी कॉ. ज्योती नालट, मीना गवई, दुर्गा वासनिक, वर्षा कापसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *