![]()
वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजारचौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीतचाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके यातरुणाचा मृत्यू झाला. यात सात जणजखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीरआहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगीरुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावाततणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्यावादातून काही दिवसांपासून दोन गटांत वादसुरू होता. किरकोळ कुरबुरीनंतर वादहाणामारीपर्यंत जात होता. मात्र पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत वादनेला जात नव्हता. दरम्यान, रविवारी (३१मे) मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांत वादउफाळून आला. किरकोळ शाब्दिकचकमकीनंतर हाणामारीला सुरुवात झाली.चाकू, लोखंडी रॉड, काठ्यांचा वापरकरण्यात आला. यात रुद्र प्रदीप दस्तके(२२) या तरुणाला चाकूचा जबर वारबसला. त्यामुळे तो खाली कोसळला. या हाणामारीत शुभम दस्तके, प्रदीपदस्तके, प्रवीण दस्तके, तसेच दुसऱ्यागटातील प्रणव भवर, पंकज भवर,प्रल्हाद भवर, योगेश भवर हे जखमीझाले. हट्टा पोलिस ठाण्याचे सहायकपोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनीतातडीने पोलिस कर्मचारी घेऊनघटनास्थळ गाठले. पोलिस आल्यानंतरपरिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस वनागरिकांनी जखमींना उपचारासाठीपरभणी येथील रुग्णालयात हलवले.मात्र रुद्र दस्तके याचा रस्त्यातच मृत्यूझाला. गंभीर जखमी असलेल्या शुभम,प्रदीप, प्रवीण यांच्यावर परभणीच्याखासगी रुग्णालयातील अतिदक्षताविभागात उपचार सुरू आहेत. प्रणव,पंकज, प्रल्हाद, योगेश हे किरकोळजखमी आहेत. वाळू उपशाचा वादअसल्याची गावात चर्चा या घटनेमागे वाळू उपशाचा वादअसल्याची चर्चा गावात सुरू आहे.पिंपळगाव कुटे येथील वाळूघाटावरून वाळू उपसा करूनवाहतूक करण्याच्या कारणावरूनवाद झाला. त्यातून हाणामारीचीघटना घडल्याची चर्चा आहे. रुद्रदस्तके हा वाळू उपशाच्या वादातीलबळी असल्याचेही बोलले जाते. तीन महिन्यांपूर्वीच झाला होता रुद्रचा विवाह मृत रुद्र दस्तके याचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. याघटनेमुळे रुद्रचे सुखी संसाराचे स्वप्न भंगले. रुद्र व त्याचे कुटुंबसोमवारी (१ जून) तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणारहोते. त्यांनी तयारीही केली होती. मात्र ही घटना घडली. वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार गावातीलवर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातीलजखमींना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.एका गटाने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याचीप्रक्रिया सुरू आहे. – संग्राम जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, हट्टा
Source link
हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात