![]()
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबटाच्या बछड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेला हा बछडा घटनास्थळीच दोन ते तीन तास तडफडत राहिला. अखेर वन विभागाच्या शेड्यूल १ बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून जखमी बिबटावर पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. या बिबट्याला तातडीने नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बचाव पथक वेळेवर पोहोचले असते तर बिबट्याच्या बछड्याचे प्राण वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया प्राणी मित्रांसह नागरिकांनी व्यक्त केल्या. गुरुवार ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याचा बछडा जखमेमुळे विव्हळत असलेला काहींना दिसला. महामार्गावर तिवसा शहरापासून १ कि.मी. अंतरावर एक ते सव्वा वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यातच तो गंभीर जखमी स्थितीत रस्त्याच्या बाजूला तो पालापाचोळ्यात उर्वरित, पान ४ जबडा, कंबरेसह पायाला मार कदाचित सकाळी ६ ते ७ वाजता ही घटना घडली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याचा व पालापाचोळ्याचा रंग सारखा असल्याने अनेकांच्या नजरेत प्रथमदर्शनी तो पडला नाही. अखेर कुणाची तरी नजर जखमी बिबटा वर पडली. ही घटना उघडकीस आली. यात बिबट्याच्या जबड्याला व कंबरेसह पायाला जबर मार लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. त्यामुळे होणाऱ्या वेदनेने बिबट्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
Source link
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा तडफडून मृत्यू:बचाव पथक उशिरा पोहोचले, तिवसा जवळ महामार्गावरील घटना