![]()
‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे तरुणांच्या मोठ्या जनसमुदायासह दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी तेथे जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अभ्यासकांच्या मते, यामुळे देशात एका वेगळ्या राजकीय क्रांतीची सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे या घडामोडींमुळे अभिजीत दिपके यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आपले घर सोडून अज्ञातस्थळी राहणे पसंत केले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. अभिजीत यांच्या मोहिमेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या जीविताला धोका असल्याची भीती आई-वडिलांनी व्यक्त केली होती. त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि समर्थकांकडून सातत्याने होणारी विचारपूस आणि गर्दीला कंटाळून आई-वडिलांसह कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे किंवा अज्ञातस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते कोणाच्याही संपर्कात नसल्याचे समजते. सुरक्षेसाठी घरावर पोलिसांचा २४ तास पहारा कुटुंबीय घरी नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या घरावर २४ तास पहारा ठेवला आहे. या संदर्भात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी सांगितले की, “सध्या तिथे एक अधिकारी आणि १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलन सुरू असताना एखादा समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही या परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे.” मुलाने राजकारण सोडून नोकरी करावी, पालकांची इच्छा अभिजीत दिपके याचे प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्येच झाले आहे. त्याचे वडील भगवान दिपके हे वाळूज महानगर येथे अभियंता (इंजिनिअर) म्हणून कार्यरत होते आणि आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. अभिजीतने आपले उच्च शिक्षण पुणे आणि त्यानंतर अमेरिकेत पूर्ण केले. त्याने काही काळ ‘आम आदमी पार्टी’च्या (AAP) सोशल मीडिया टीमसाठी अत्यंत प्रभावीपणे काम केले होते. त्यानंतर न्यायालयात युवकांविषयी झालेल्या एका वक्तव्यानंतर त्याने ‘कॉक्रोज जनता पार्टी’ची स्थापना केली आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. “राजकारण हे आपले काम नसून अभिजीतने चांगली नोकरी करावी आणि कुटुंबाकडे लक्ष द्यावे,” अशी इच्छा त्याची आई अनिता यांनी व्यक्त केली होती. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतरही अभिजीत अद्याप आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेला नाही.
Source link
अभिजीत दिपकेंचे दिल्लीत आंदोलन:छत्रपती संभाजीनगरच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त, 24 तास पहारा; कुटुंबीय अज्ञातस्थळी