Headlines

Bengal’s transgender becomes a role model; Changing perspectives by becoming a teacher, dancer, beautician


  • Marathi News
  • National
  • Bengal’s Transgender Becomes A Role Model; Changing Perspectives By Becoming A Teacher, Dancer, Beautician

बबिता माली | कोलकाता2 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

दशकांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर एलजीबीटीक्यू समुदायाची त्यातही ट्रान्सजेंडर्सची ओळख आता बदलत आहे. भेदभाव, उपेक्षा व संधी अभावाचा सामना करणारे पश्चिम बंगालचे ट्रान्सजेंडर आदर्श बनत आहेत. कष्ट व प्रतिभेने नवे शिखर गाठत आहेत. प. बंगालमध्ये केएसडब्ल्यूएस व पीएलईक्यूएसयूएस इंडिया फाउंडेशन सारख्या संस्था शिक्षण, कौशल्य विकास व रोजगाराद्वारे या बदलाला दिशा देत आहेत. संस्थेचे समन्वयक अभिनव दत्ता म्हणाले, अनेक लोक भीक, उपेक्षित जीवनातून बाहेर पडून सन्मानजनक रोजगार, स्वावलंबनाच्या नव्या वाटेवर चालत आहेत. आज अशाच तीन प्रेरक कथा पाहू. यातून संधी मिळाल्यास आयुष्य कसे बदलते हे जाणून घेऊ.

1. लोकांचा गैरव्यवहार सहन केला, घर सोडले, जेंडर बदलले, आता आई-वडिलांचा आधार

मी २९ वर्षांची ट्रान्स वुमन आहे. नववीत होते, तेव्हा मला मी मुलगा नाही, मुलगी आहे असे वाटे. बारावीत असताना एका संस्थेत नोकरी मिळाली. पण तिथे माझ्याशी गैरव्यवहार झाला. २०२० मध्ये मी पालकांना जेंडर बदलण्याची इच्छा सांगितली. मी मुलगी बनावे असे त्यांना वाटत नव्हते. मग मी घर सोडले. नंतर कुटुंबाने मला स्वीकारले. २०२१-२२ मध्ये मी जेंडर चेंज करून घेतले. संस्थेने दोन महिन्यांचे ब्युटीशियन ट्रेनिंग दिले. आज मी घरोघरी जाऊन हेअर कटिंग, फेशियल व पार्लरची सर्व कामे करते. यातूनच आई-वडिलांची काळजी घेते. – दिया दास बहरामपूर – ब्यूटीशियन, एमएची विद्यार्थिनी

2. आधी माझी ओळख घाबरवणारी, आज त्याच ओळखीसोबत सगळे जग फिरतेय

मी १४-१५ वर्षांची होते तेव्हापासून स्वतःला महिला समजते. एके दिवशी मला मारहाण झाली. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा लोकांना माझ्याबद्दल समजले. तेव्हा मी सर्वात आधी माझ्या आईला माझ्या भावनांबद्दल सांगितले. तिने मला समजून घेतले आणि माझ्या पाठीशी उभी राहिली. आज मी क्लासिकल डान्सर आहे. अनेक देशांमध्ये सादरीकरण करण्यासाठी जाते. अलीपूरद्वारमध्ये मी माझ्या समुदायातील लोकांना कायदेशीर मदत मिळवून देते. शिवणकाम-भरतकाम, मेंदी, केक बनवण्यासारखे ट्रेनिंग देते. मी एक डान्स क्लासही सुरू केला आहे. – राजा दत्ता (२८) अलीपूरद्वार- क्लासिकल डान्सर आणि प्रशिक्षक

3. १८ वर्षांपासून एकटी, शिक्षणाने खचूदिले नाही, तीच माझी मोठी ताकद बनली

मी संपन्न पुराणमतवादी कुटुंबातील आहे. २००५-०६ मध्ये मी मुर्शिदाबादची पहिली विजिबल ट्रान्स वुमन म्हणून ओळखली गेले. वडिलांनी माझ्याशी बोलणे बंद केले. २००७-०८ पासून मी एकटी राहत आहे. शाळा-कॉलेजात माझी टिंगल झाली. मी इंग्रजीत मास्टर्स केले.बीएड केले.दोन वेळा टीचर ट्रेनिंगही घेतले. नोकरीसाठी मी अनेक मुलाखती दिल्या. पण संधी मिळाली नाही. नंतर मी शिक्षणालाच शस्त्र केले. मुलांची शिकवणी सुरू केली. मी मुर्शिदाबादमध्ये डान्स स्कूल सुरू केले. आज मी डान्सर, ट्यूटर व मॉडेल आहे. – कंचन (35) मुर्शिदाबाद, क्लासिकल डान्सर, ट्यूटर आणि मॉडेल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *