Headlines

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’:12 तासांत 1.17 कोटीचा मुद्देमाल जप्त; 72 आरोपी गजाआड, 53 गुन्हे दाखल




जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्रीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. ६ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ जून रोजी पहाटे ६ यादरम्यान या अवघ्या १२ तासांत ७२ आरोपींवर ५३ गुन्हे दाखल केले असून, एकूण १ कोटी १७ लाख ८४ हजार १५० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या थेट नियंत्रणाखाली अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण केले. बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकांचे परवाने निलंबनासाठी आरटीओंकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. कारवाईचा मुख्य तपशील : ११ वाळू तस्करांना पकडले : गौण खनिजाची चोरी, बेकायदा वाहतूक करणाऱ्यावर बीएनएस व गौण खनिज कायद्यान्वये ८ गुन्हे दाखल केले. यावेळी ८ वाहनांसह १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. २० हातभट्ट्या उद्ध्वस्त : २० ठिकाणांवर वेळी छापे टाकून २० आरोपींना अटक केली. तेथे ५,६१८ लिटर हातभट्टीचे रसायन आणि ४१९ लिटर तयार दारू व इतर साहित्य नष्ट केले. १८ दारू विक्रेते ताब्यात : विनापरवाना देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री व साठवणूक करणाऱ्या १८ आरोपींतकडून ९२५ बाटल्या व वाहन जप्त केले.जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ५६ हजार ६५० रुपये आहे. गुटखा जप्त : जुगार खेळणाऱ्या २१ आरोपींकडून १७,५६० रुपयांचे जप्त करून ६ गुन्हे दाखल केले. खुलताबाद पोलिसांनी वाहनासह ७०,६०० रुपयांचा गुटखा जप्त केला. खांदेपालटानंतर ग्रामीण पोलिस ‘अॅक्शन मोड’वर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक पदाची धुरा नव्या अधिकाऱ्यांनी सांभाळल्यापासून ग्रामीण पोलिसांचा संपूर्ण पॅटर्न बदलला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा अचानक ‘अॅक्शन मोड’वर आली. नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी थेट ग्राउंडवर उतरून मोहीम हाती घेतली. वरिष्ठ पातळीवरील या प्रशासकीय बदलांमुळेच केवळ १२ तासांत इतकी मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करणे शक्य झाले. अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय नाही यापुढेही अशाच प्रकारे अचानक नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि ‘ऑपरेशन ऑल आऊट’’’’ सातत्याने राबवले जाईल. जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *