Headlines

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन:मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये मुख्य सोहळा, संभाजीनगरातही उत्साहात कार्यक्रम




राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चा २७ वा वर्धापन दिन आज राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे मुख्य सोहळा पार पडत असून, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या वैचारिक वारशाला उजाळा दिला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये, “आजच्याच दिवशी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली होती,” असे म्हणत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. सुप्रिया सुळेंची पोस्ट.. आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन…! आजच्याच दिवशी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली होती. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान देत आलो आहोत. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार आपल्या कामाचे सूत्र आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची भूमिका आपण जपली आहे आणि यापुढेही ती अधिक दृढपणे पुढे नेऊ. आपली निष्ठा महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारधारेशी तर बांधिलकी येथील जनतेशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा कायम ठेवण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला आणि यापुढेही करु. या २७ वर्षांच्या प्रवासात पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, पदाधिकाऱ्यांचे, लोकप्रतिनिधींचे आणि शुभचिंतकांचे मनापासून आभार. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभचिंतकांना पक्षाच्या २७ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचा वर्धापन दिन आज हडको येथील पक्षाचे मुख्य कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून पक्षाच्या अधिकृत ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. रोहित पवारांची पोस्ट.. रोहित पवार यांनी आपल्या संदेशात लोकशाही, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाल्याचे नमूद केले. राज्यातील सामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे पक्षाचा विचार घराघरात पोहोचल्याचे सांगत त्यांनी जनतेचा विश्वास हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे म्हटले. तसेच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाजघटकांना सोबत घेऊन महाराष्ट्र धर्माची पताका उंचावत पक्षावरील जनतेचा विश्वास आगामी काळातही अधिक दृढ होत राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन:आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार भावुक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असून, खासदार पार्थ पवार, युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दिल्लीतील कार्यक्रमानंतर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुख्य वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *