Headlines

माझी बदनामी करण्यासाठी कट रचला गेला:अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा




अशोक खरात प्रकरणावरून आपल्यावर आणि कुटुंबावर करण्यात आलेले आरोप अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत माजी मंत्री रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न काही विकृत लोकांनी केला,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनेकांना कायदेशीर नोटिसाही पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी त्यांचा कधीही संबंध नव्हता. तसेच कोणत्याही महिलेला आपण खरात यांच्याकडे घेऊन गेलो असल्याचा आरोपही पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कुटुंबीयांनी खरात यांना गुरुस्थानी मानले होते आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाद्यपूजेचा व्हिडीओही जुना असल्याचे त्यांनी सांगितले. बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा यासाठी आपण मंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता, याची आठवण करून देत चाकणकर म्हणाल्या की, आता त्यांची लढाई कायद्याच्या चौकटीतून सुरू राहणार आहे. सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांतून बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून अनेकांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरोधातील ही माझी लढाई आहे. सत्य बाहेर येईल आणि कायद्याच्या माध्यमातून योग्य उत्तर दिले जाईल,” असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्यांच्या या भूमिकेमुळे अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाण्यात संतापजनक प्रकार!:किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर किरकोळ वादातून एका वृद्ध नागरिकाला ओला चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *