![]()
खासदार ओमराजे निंबाळकर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ओमराजे निंबाळकर म्हणाले, आज मी आल्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माझ्या लोकांना विनंती केली होती की इथे उपस्थित राहावे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील जिवाभावाची लोक उपस्थित होती. सगळ्यांशी चर्चा केली आणि सगळ्यांचे मत जाणून घेतले. ही सगळी मत जाणून घेतल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या सूचना आहेत, मला जरा पार्श्वभूमी सांगायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सगळे कार्यकर्ते लढत असताना सुद्धा धाराशिव मंतदारसंघाचा विचार केला तर पालिकेत आम्हाला यश मिळू शकले नाही. मी असेल, आमचे सगळे सहकारी असतील आम्ही 24 तास सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, आम्ही कामात कधी कमी पडलो नाही. पण दुर्दैवाने सत्तेमुळे आम्हाला या पराभवाला सामोरे जावे लागले. मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचे आहे की सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे आहोत. आज सगळ्यांचे माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे की शिवसेना पक्षात आम्ही जाणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत. वाईट वृत्तीची लोक राजकारणाच्या पटलावर राहिली नाही पाहिजेत आपण बघितले असेल ज्या कारणामुळे मी माझे सार्वजनिक जीवन सुरू केले, की या वाईट वृत्तीची लोक राजकारणाच्या पटलावर राहिली नाही पाहिजेत. ती भूमिका मी चोखपणे पार पाडत आलो. महाराष्ट्र पोलिस जे तपास करत आहे ते दबावाखाली करत आहे, असे आम्हाला वाटले आणि याची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी अशी याचिका आम्ही हायकोर्टात केल्यानंतर या हात्याकांडाचा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. 20 वर्ष ही प्रक्रिया चालली. निकाल आपल्या बाजूने येईल अशी अपेक्षा होती. पण कोर्ट म्हणत आहे की राजकीय वैमनस्य होते, ते मान्य करत आहे. कुठल्याही हत्याकांडात उद्देश महत्त्वाचा असतो तेही कोर्ट मान्य करत आहे. पण दुर्दैवाने कळंबोली पोलिस स्टेशनच्या तपासाला पेस्ट करून जो निकाल आला तो अतिशय दुर्दैवी आला. ओमराजे निंबाळकर म्हणाले, यात एक माणूस त्यात सक्षमपणे पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटले नव्हते. निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझे बोलणे झाले, त्यांनी अमित शहा यांच्याशी देखील माझे बोलणे करून दिले. आम्ही त्यांना इतकीच विनंती केली आम्हाला कोणाचा फेवर नकोय, पण आम्ही जो संघर्ष मागच्या 20 वर्षांपासून करत आहोत, न्याय मागत आहोत आणि तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन स्टेटमेंट दिले होते आणि सीबीआय त्या ठिकाणी हायकोर्टात अपील दाखल करणार आहे. कुठल्या पैशांसाठी, पदासाठी जाणारा ओमराजे नाही पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, कुठलाही पक्ष असला तरी अशा वृत्तीला राजकारणातून थांबवण्यासाठी जे काही करावे लागणार आहे त्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही आणि मला कोणी रोखूही शकत नाही. आज सत्तेची ताकद घेऊन त्याठिकाणी आमच्यासारख्या सामान्य माणसावर जो अन्याय होत आहे, लोकांना अडवले जात आहे. खासदारांनी हे काम करावे, ट्रान्सफॉर्मर द्यावे, अशी अपेक्षा असतात. आता 7 वर्ष होत आले आहेत. त्या माणसाच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. या सगळ्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम मी इथून पुढे करत राहील. सामान्य माणूस ओमराजेला ओळखतय. त्या सामान्य माणसांसाठी मी काय काम करतो हे त्यांनी पाहिले आहे. कुठल्या पैशांसाठी किंवा हव्यासासाठी, पदासाठी जाणारा ओमराजे नाही. मातोश्रीबद्दल एकही वाईट शब्द जाणार नाही ओमराजे निंबाळकर म्हणाले, माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणी नाही, माझ्याकडे सर्वसामान्य माणसं आहेत. मी त्या लोकांसाठी काम करत राहील. हे वचन मी तुम्हाला देत आहे. माझा असा कोणता वेगळा व्यवसाय सुरू आहे आणि त्याला संरक्षण मिळवण्यासाठी मी तिकडे जात आहे, असे अजिबात नाही. माझ्यावर काही ईडी सीबीआयची धाड पडली असेही काही नाही. मी सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस आहे. या सत्तेचा उपयोग कशाप्रकारे केला जाऊ शकतो हे निश्चितपणे आम्ही धाराशिवच्या लोकांना दाखवून देऊ. आदरणीय उद्धवजी, आदित्यजी, बाळासाहेब यांचे प्रेम मला लाभले आहे, आशीर्वाद लाभला आहे. माझ्या मनात, माझ्या तोंडात कोणाबद्दलही वाईट शब्द आलेला नाही. येणारही नाही. मातोश्रीबद्दल एकही वाईट शब्द जाणार नाही.
Source link
'एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार':खासदार ओमराजे निंबाळकरांचं ठरलं, पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली