Headlines

एस.टी. कामगारांना चांगले वेतन, विविध सुविधा द्या:एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी‎




राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. सोमवारी द्वारसभा आंदोलन झाले. एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्या. इतर मागण्याही मांडण्यात आल्या. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. चालक कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा आंदोलन करण्यात आले. या द्वारसभेला सविता नागवंशी, चंद्रशेखर चऱ्हाटे, आर. एस. देशमुख, नांदरत्न खंडारे, सचिन तायडे, इर्शाद खान, अलताफ शाह, संतोष भटकर, मो. जाफर, पी. एन. डोंगरे, के. आर. राठोड, पी. एस. लासुरकर, पी. एस. मसाने, व्ही. बी. वानखडे, पी. डी. गुरव, एस. आर. डोड, एस. एस. निर्मल, जी. एन. गावंडे, आर. टी. मालखेडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुढील मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. सन २०१६ पासून ३ टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात यावी. घरभाडे भत्ता १० टक्के, २० टक्के व ३० टक्के प्रमाणे लागू करण्यात यावा. महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करावी. एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. २९ जूनपासून धरणे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले आहेत. २९ जूनपासून धरणे आंदोलन होणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी शासनाने दखल न घेतल्यास, कृती समितीने ठरविल्याप्रमाणे सर्व कामगार धरणे आंदोलनावर ठाम राहतील. असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *