![]()
रस्त्यावरून जाणाऱ्या एका विवाहितेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने, एका गुंडाने पतीसमोरच महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब विचारणाऱ्या पीडितेवर आरोपीच्या आईने थेट चाकूने वार केले. हा प्रकार 20 जून रोजी दुपारी शहरातील टाऊन हॉल परिसरातील लाल मशिदीसमोर घडला. फिर्यादी महिला आणि तिचे पती शनिवारी दुपारी दवाखान्यातून दुचाकीवरून घरी परतत होते. त्या वेळी मुजाहेद आलम मुख्तार आलम (रा. आसेफिया कॉलनी) याने त्यांचा पाठलाग करत महिलेला अश्लील इशारे केले. सुरुवातीला महिलेने दुर्लक्ष केले, मात्र तो शुकशुक करून त्रास देऊ लागल्याने पतीने दुचाकी थांबवून त्याला जाब विचारला. यावर आरोपीने मुजोरी करत, “तुम्ही पाहिले नसेल, तर आता तुमच्यासमोरच तिचा हात धरतो. ये लो, अभी आपके सामने हाथ पकडा है, क्या कर लोगे तुम?’ असे उघड आव्हान देत महिलेचा हात पकडला. आईचा चाकूहल्ला अन् नागरिकाला दुखापत या संतापजनक प्रकारानंतर पीडितेने तेथेच असलेल्या आरोपीच्या आईला (शमीम बेगम) “तुमच्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब विचारला. याचा राग आल्याने शमीम हिने थेट चाकू काढून महिलेच्या दंडावर वार केले. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही या मायलेकांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी मुजाहेद याने दुसरा मोठा चाकू काढून पतीवर वार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात मुजाहेद आलम आणि त्याची आई शमीम बेगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
‘तुझ्यासमोरच हात पकडतो, काय करशील? पतीदेखत महिलेचा विनयभंग:जाब विचारताच मायलेकाकडून चाकूहल्ला, छत्रपती संभाजीनगरची घटना