Headlines

Champat gets slapped; had to resign from post, 8 people arrested so far, 79.85 lakhs seized, politics also heated up


  • Marathi News
  • National
  • Champat Gets Slapped; Had To Resign From Post, 8 People Arrested So Far, 79.85 Lakhs Seized, Politics Also Heated Up

अयोध्या/लखनौ9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगीच्या कथित चोरी व अपहार प्रकरणातील सर्व आठही आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील सुनावणीवेळी पोलिस त्यांची कोठडी मागून चोरीची रक्कम, बँक खाती, मालमत्ता, संपूर्ण नेटवर्क व इतर आरोपींच्या भूमिकेची चौकशी करतील. आतापर्यंत ~७९.८५ लाख रुपये जप्त केले आहेत.

सूत्रांनुसार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय व विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, ट्रस्ट किंवा यूपी सरकारने याला दुजोरा दिलेला नाही. एफआयआरमध्ये या दोघांचे नाव नाही, पण एसआयटीने त्यांची चौकशी केली आहे. एफआयआरमध्ये रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनीष यादव, अविनाश शुक्ल, करुणेश पांडे, सुभाष श्रीवास्तव व रमाशंकर मिश्रा यांची नावे आहेत. एका अज्ञात आरोपीचाही यात उल्लेख आहे. आरोपींमध्ये ५-६ बँक कर्मचारी आहेत, ज्यांना बँकेने रोकड मोजण्यासाठी तैनात केले होते. त्यांना बँकेकडून पगार मिळत असे. लोकसेवक असल्याने आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलमेही लावली आहेत. विशेष म्हणजे, २३ जूनला सरकारला सोपवलेल्या एसआयटी अहवालातील शिफारशींनंतर एफआयआर दाखल झाला. ट्रस्टचे सदस्य म्हणाले – अपहार झाला असल्यास दोषींना शिक्षा व्हावी.

कुणीही वाचणार नाही : योगी

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही’

चोरांना फाशी द्या: केजरीवाल आपचे अरविंद केजरीवाल म्हणाले, “हे ‘धर्मयुद्ध’ आहे. देणगी चोरणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे. जे रामाच्या आधारावर सत्तेत आले, त्यांना रामच सत्तेबाहेर काढेल.”

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याची स्वतंत्र चौकशी व्हावी.” तर, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याला भाजपचे ‘लंकाकांड’ म्हटले.

मोजणीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे झाकून चोरी केली

एसआयटी चौकशी व एफआयआरनुसार देणगीची चोरी पूर्वनियोजित पद्धतीने होत असे. दानपेटी उघडल्यानंतर रोकड तळघरातील मोजणी कक्षात आणली जात असे. मोजणीदरम्यान काही कर्मचारी नोटा बाजूला काढत असत. सूत्रानुसार, सीसीटीव्ही कॅमेरे झाकूनही रक्कम लांबवली जात असे. तोंडी, कागदोपत्री, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चोरी, अपहार आणि कटाचे पुरावे मिळाले.

चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचीच नावे चर्चेत का?

  • चंपत राय हे ट्रस्टचे सरचिटणीस व विहिंपचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ट्रस्टचे प्रशासकीय कामकाज, समन्वय व संवादाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. टिन्नू यादव हा त्यांचा माजी ड्रायव्हर असल्याचे सांगितले जाते.
  • अनिल मिश्रा हे संस्थापक विश्वस्त. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते ‘यजमान’ होते. देणगी स्वीकारणे व मोजणीवर लक्ष ठेवण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. जमीन खरेदीच्या वादातही त्यांची साक्षीदार म्हणून नोंद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *