![]()
जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार नशेच्या गोळ्या जप्त करून 16 आरोपी निष्पन्न केले.दहशतवादविरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन तरुणही घेत असल्याचे पुढे आले आहे. आरोपींच्या संपर्कात काही महाविद्यालयीन तरुण असल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांनी या तरुणांना गुन्हेगार न करता त्यांच्यासह 119 पालकांपर्यंत पोहोचून मुलांवर लक्ष ठेवण्याबाबत सतर्क केले आहे. त्यांनाही समज दिली आहे. एकाला घेतले ताब्यात 28 एप्रिल 2026 रोजी कदीम पोलिसांनी नूतन वसाहत भागातून एकाला ताब्यात घेतले. संपर्कातील आरोपींना ठराविक मेडिकल वालेया गोळ्या देत आहेत. यामुळे पोलिसांना अडचणी येतात. सिरपचा साठा केला जप्त 11 जून 2026 रोजी जालना शहरातील नूतन वसाहत भागातून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बटन गोळ्या व सिरपचा साठा जप्त केला गोळ्या संपर्कातील व्यक्तींना विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली एक्सप्लेनर विक्रम साळी, अपर पोलिस अधीक्षक, जालना. एकाला घेतले ताब्यात कारवाईसाठी पथकाची तीन महिन्यांपासून पाळत दहशतवादविरोधी पथकाला पाणीवेस भागातील वसंत हा मेडिकल धारक बटण गोळ्यांची विक्री करतो, अशी माहिती होती. तीन महिन्यांपासून वेगवेगळे नागरिक,स्वतः पोलिस जाऊन गोळ्यांची मागणी करीत होते. परंतु, तो गोळ्या देत नव्हता. ज्याने गोळ्या आणल्या, तो विक्रीला आल्याची माहिती मिळताच ताब्यात घेतले. त्यानंतर ही कारवाई झाली. विना परवानगी साठा ठेवणाऱ्यांवर कारवाया केल्या.
Source link
जालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!