Headlines

एमपीएससी ऑनलाईन परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी:रोहित पवारांचा पाठिंबा, मुख्यमंत्री-आयोगाला भेटणार शिष्टमंडळ




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत असून, ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षांचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच यासंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने सरकारने ऑनलाइन परीक्षा रद्द कराव्यात. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांना विद्यार्थी शिष्टमंडळ भेटून यावर चर्चा करणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपास शांत झाल्याने, सीबीआयच्या तपासावरही आमचा विश्वास नाही, असे मत पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. आमदार सचिन आहेर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कपड्यांप्रमाणे नेते पक्ष आणि विचार बदलत असतील, तर ही लोकशहा ीसाठी गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. एका बाजूला विद्यार्थ्यांना हजार रुपये मिळू शकत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकार पैशाचा वापर करून लोकप्रतिनिधी फोडत आहे. ही लोकशहा ीची गळचेपी करणारी कृती आहे. आहेर यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश निषेधार्ह आहे. यामुळे लोक उद्विग्न होऊन भविष्यात नवीन लोकांना निवडून आणतील, असेही पवार म्हणाले. महाविकास आघाडीमधील पक्ष अशा घटनांमुळे कमकुवत होत आहेत. मी भाजपसोबत कधीही जाणार नाही. आमच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार फुटणार नाहीत. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्नही केला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारला संसदेत डिलिमिटेशन बिल आणून ते पास करण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज आहे. त्यामुळे ते विविध राज्यातील खासदार आणि आमदार फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 18 दिवस पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फोडले, असा आरोप पवार यांनी केला. पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी फोडले जात असतील, तर भविष्यात लोकशहा ीला धोका आहे. एकनाथ शिंदे हे भाजपला खासदार आणि आमदारांची गरज असल्याने फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. परंतु, भाजप 2029 मध्ये निवडणूक स्वबळावर लढेल आणि सोबतच्या दोन पक्षांनाही धोका देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये सध्या जी पदे दिली जात आहेत, त्यावरून भाजपचा प्रभाव दिसून येत आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *