![]()
विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील पाचवी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जर
.
बालिका साडेचार वर्षांवरील असल्याने ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पुढील एक वर्ष स्पीच थेरपी विनामूल्य करण्यात येणार आहे. या माध्यमातून रुग्णाला शस्त्रक्रिया व स्पीच थेरपीचा लाभ विनामूल्य मिळणार आहे.
सदर जटिल शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. क्षितीज पाटील, डॉ. रितेश शेलकर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी व ईएनटी सर्जन डॉ. मंगेश मेंढे, ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, बालरोग तज्ञ डॉ. नितीन बर्डिया, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. अश्विनी मडावी, न्यूरो फिजिशियन डॉ. अनिता अंभोरे, रेडिओलॉजिस्ट डॉ. शशांक दूरशेट्टीवार यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.
सदर शस्त्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला मोहोड, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, ऋषीकेश धस, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, अधिसेविका चंदा खोडके, मालती प्रधान यांच्या सूचनेनुसार न्यूरो इंचार्ज सिस्टर दीपाली देशमुख, अलका मोहोड, वैशाली नागराळे, मनीषा रामटेके, दीपिका वाटोडकर, विजय गवई, यश गवई, शुभम गवई, राहुल वायझाडे, शीतल सानप, सुचिता खराते, लिना ठाकरे, ज्योत्स्ना खोब्रागडे, आदिती तिथे, स्नेहा राठोड, संगम उमरे, नीलिमा तायडे, पुष्पा तायडे, शुभांगी टीगणे, प्रतीक्षा भगत, स्वाती घवले, ज्योत्स्ना कांबळे, मनीषा कान्हेरकर, सिद्धार्थ उगले, फार्मासिस्ट योगेश वाडेकर, बायोमेडिकल इंजिनिअर अमोल वाडेकर, प्रशांत शिरे, आकाश काळे, वेदांत इंदुरकर, ज्ञानेश लांजेवर, राहुल कवनपुरे, नंदनलाल राठोड यांचे शस्त्रक्रियेत विशेष सहकार्य होते. सदर रुग्ण रा. रासेगाव, ता. अचलपूर, जि. अमरावती येथील रहिवासी असून जन्मापासून तिला ऐकू येत नव्हते. ती दोन वर्षांची झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना समजले की ती ऐकू शकत नाही. सुरुवातीला रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली. शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असल्याने रुग्णासह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे आणले. रुग्णास ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर २५ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमध्ये पारंपारिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ठरला महत्वाचा