![]()
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर करून तिला ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून हा नामांतर सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार राम सातपुते, करमाळा नगराध्यक्षा मोहिनी सावंत, रश्मी बागल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, सहआयुक्त संगीता खंदारे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमात संदेश कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. स्व. मदनदास देवी यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिक्षणाची ओढ आणि समाजसेवेची प्रेरणा जागविण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावाने संस्थेचे नामकरण झाल्यामुळे भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव:शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याचा केला कार्याचा गौरव; नामांतर सोहळा उत्साहात