Headlines

10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिंगणापूरचे प्रसादालय अखेर आजपासून होणार सुरू:अन्न शिजवण्यापासून स्वच्छतेपर्यंतची कामे आता स्वयंचलित होणार‎




श्री शनेश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील प्रसादालय नूतनीकरण व अत्याधुनिक बदलांनंतर बुधवारपासून ,१ जुलै भाविकांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये हे प्रसादालय नूतनीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले असून प्रसादालय भक्तांसाठी खुले होत असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली. नाशिकचे प्रशासक तथा विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या प्रसादालयामध्ये उत्तम दर्जाचे भोजन तयार करण्यासाठी ‘सेवा पुरवठादाराची’ नियुक्ती ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयासाठी लागणारे इतर सर्व आवश्यक साहित्य खरेदीसुद्धा निविदा/दरपत्रक प्रक्रिया राबवून पूर्ण करण्यात आली आहे. या प्रसादालयाच्या आधुनिकीकरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रेलिया येथील भक्त किशोर माटा यांनी स्वयंपाकघरासाठी १.७५ कोटी रुपयांचे आधुनिक साहित्य व यंत्रसामग्री देणगी स्वरूपात दिली आहे. त्यांच्या या दातृत्वातून स्वयंपाकघर उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. आता अन्न शिजवण्यापासून ते पूर्ण स्वच्छता राखण्यापर्यंतच्या मुख्य बाबी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रांद्वारे केल्या जातील, ज्यामुळे प्रसादाची शुद्धता आणि गुणवत्ता टिकून राहील. नूतनीकरण केलेल्या या अत्याधुनिक प्रसादालयामध्ये एकाच वेळी साधारण १ हजार भाविक बसून महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. प्रसादालय बंद राहण्यामागची मुख्य कारणे जुन्या पद्धतीऐवजी स्वयंपाकघर उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज करायचे होते, जेणेकरून देश-विदेशातून येणाऱ्या हजारो भाविकांना गतीने भोजन उपलब्ध करून देता येईल. अन्न शिजवण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व गोष्टींसाठी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रे बसवण्याचे काम सुरू होते. नवीन नियमांनुसार उत्तम दर्जाचे भोजन मिळावे यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करणे आणि दर्जेदार साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा वेळ लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *