Headlines

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎



“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र

.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड आणि ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसने दिलेल्या इन्व्हर्टर व बॅटरी साहित्याचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी गणोरेचे सरपंच संतोष आंबरे होते.

याप्रसंगी संगमनेर रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग म्हणाले की, ग्रामीण भागांतील शाळा डिजिटल साधनांनी समृद्ध करणे गरजेचे आहे. तेथील विद्यार्थ्यांना विकसित तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळाल्यास देश अधिक समृद्ध व सामर्थ्यवान होईल. यासाठी समाजसेवक आणि दानशूरांनी पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिंदेवाडी शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली आहे. उमंग फाउंडेशन व सेंट्रल बँक: यांच्या वतीने शाळा आवाराला संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह बांधून देण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. स्व. रोहिणी आरोटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेत पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून शाळेचे रंगकाम करून घेतले आहे. ऋषिकेश मोंढे यांच्याकडून स्टील कपाट, प्रा. मंगल गोडगे यांच्याकडून मोफत वह्या, दिगंबर दातीर यांच्याकडून स्टील ग्रील, जिजाऊ ब्रिगेडकडून ३५ विद्यार्थ्यांना गणवेश, तर अनिता कोदे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शूज व सॉक्ससाठी आर्थिक मदत देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय हांडे यांनी, तर आभार कल्पना पाटील यांनी मानले. या प्रसंगी राजेंद्र आंबरे, जगन्नाथ आहेर, अशोक आहेर, दिगंबर दातीर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *