Headlines

हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; संगमनेरकरांनी रस्त्यावर उतरावे:डॉ. जयश्री थोरात यांचा आराेप, मविआ काळातील मंजूर मार्ग बदलल्याचा दावा‎



महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाशिक-पुणे रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी हा मार्ग बदलण्यात आला. संगमनेर आण

.

नाशिक-पुणे रेल्वेप्रश्नी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. थोरात यांनी आक्रमक भूमिका मांडली. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. थोरात यांनी मविआ काळातील कामांची आकडेवारी जाहीर करत सरकारला धारेवर धरले. मंजूर मार्ग कोणता होता? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून पुणे – चाकण – नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – सिन्नर – नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला होता. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ७०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम देऊन भूसंपादन प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक बैठका घेऊन सुपीक जमीन आणि वनक्षेत्राचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने हा मार्ग फायनल केला होता. मात्र, २०२४ नंतर महायुती सरकारने यात खोडा घातला. पालकमंत्री कधी रेल्वे शिर्डीमार्गे तर कधी देवठाणमार्गे जाणार असल्याचे सांगून संभ्रम निर्माण करत आहेत. पण वस्तुस्थिती हीच आहे की संगमनेरच्या वाट्याची रेल्वे शेजारच्या तालुक्याकडे वळवली गेली आहे. हा प्रश्न आता केवळ पुढाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.

विद्यार्थी, चाकरमान्यांच्या जीवाशी खेळ संगमनेर हा सहकार, शिक्षण आणि व्यापाराच्या क्षेत्रात राज्यातील एक अग्रगण्य तालुका आहे. तालुक्यातील २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि तरुण शिक्षण व रोजगारासाठी पुण्यात स्थायिक आहेत. रेल्वे झाली असती तर हे अंतर अवघ्या दोन तासांत कापता आले असते. मात्र, आता नागरिकांना ५ ते ६ तासांचा खडतर बस प्रवास करावा लागतोय. अनेक तरुण दुचाकीने प्रवास करताना अपघातग्रस्त होत आहेत, याकडे डॉ. थोरात यांनी लक्ष वेधले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *