Headlines

हिंगोलीत दुचाकीचा भीषण अपघात:पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, कांडलीफाटा शिवारातील घटना




आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ता. 1 उत्तरीय तपासणी करणयात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (ता. हदगाव) येथील अर्जुन इंगळे हे त्यांच्या पत्नीसह मंगळवारी ता. 29 दुचाकी वाहनावर नांदेड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेऊन रात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर मार्गे उमरी गावाकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन वारंगा ते आखाडा बाळापूर मार्गावर आले असतांना कांडलीफाटा शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, जमादार गजानन राठोड, प्रशांत शिंदे, राजेश घोंगडे, पांढरे, परमेश्‍वर सरकटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अर्जून यांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्जून यांच्या पत्नीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, मयत अर्जुन यांच्या मृतदेहावर बुधवारी ता. 1 आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, सदर अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलिसांनाही मिळू शकली नाही. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. मयत अर्जुन यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी संगितले.या घटनेमुळे उमरी गावावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *