Headlines

जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’:108 सरासरीच्या तुलनेत 66 मिमी बरसला, 42 मिमी पावसाची तूट कायम‎


.

“एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सरासरीच्या ४२ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचे २३ दिवस ‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

यंदा मे महिन्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर गेला. मे महिन्याच्या शेवटच्या ४ दिवसांत मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले होते. त्यामुळे १ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. १ जूनपासून भारतीय हवामान विभागाचे दरवर्षीप्रमाणे पावसाचे अंदाज सुरू झाले होते. पण तुरळक वगळता पावसाने दमदार हजेरी लावली नाही. एआय इमेज

सर्वसामान्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ म्हणजे मुसळधार पाऊस असा समज असतो. मात्र, हवामान शास्त्राच्या भाषेत याचा अर्थ “केवळ लक्ष ठेवा” असा असतो. म्हणजेच स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

समुद्रातील बाष्ण वाढल्याने स्थिती ^ “केवळ ढगाळ वातावरण निर्माण होण्याचे मुख्य कारण ‘एल निनो’ असले तरी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही मोठ्या दुष्काळाची स्थिती निर्माण होणार नाही. सध्या समुद्रातील बाष्पाचे प्रमाण अधिक वाढल्यानेदेखील ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच वेधशाळेचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे पावसाचा अंदाज व्यक्त करणे सोपे झाले आहे. मात्र सध्या दिलेले बहुतांशी अंदाज हे फोल ठरलेले दिसत आहेत.” – बी.एन.शिंदे, हवामान तज्ज्ञ.

पर्जन्यछायेचा प्रदेश: अहिल्यानगर जिल्हा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येतो. अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे सह्याद्री पर्वतरांगा ओलांडताना आपले बहुतांश बाष्प घाटावरच सांडतात. त्यामुळे जिल्ह्यात येईपर्यंत ढगांची बरसण्याची क्षमता संपते. समुद्रातील बाष्प: समुद्रात बाष्पाचे प्रमाण सध्या अधिक वाढल्याने ढगाळ वातावरण तयार होते, पण पाऊस पडत नाही. यामुळेच अत्याधुनिक यंत्रणा असूनही वेधशाळेचे अंदाज चुकले. “ब्लँकेट अलर्ट’चा गोंधळ: हवामान विभाग संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच सरसकट अंदाज वर्तवतो. मात्र, अहिल्यानगरसारख्या मोठ्या क्षेत्रफळाच्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याचे हवामान वेगळे असल्याने तांत्रिक संभ्रम निर्माण होतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *