![]()
बिडकीन सोशल मीडियावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे तसेच मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाज, बिडकीन व चितेगाव सर्कलच्या वतीने शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त करत मूकमोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुंबईतील भांडूप (पश्चिम) येथील राजू थाटे नामक व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक भाषेचा वापर केला आहे. या वक्तव्यामुळे समाजात तेढ आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी रमेश शिंदे, उमेश त्रिभुवन, भरत मोघे, राहुल मिसाळ, किशोर मिसाळ, अंकुश अवचिंदे, किशोर कांबळे, शाम पाटोळे, रवींद्र गायकवाड, संदीप बत्तीसे, अण्णा बत्तीसे, सचिन गायकवाड, नीलेश आव्हाड, आदित्य घुले, कृष्णा जगधने, विशाल जगधने, नितीन मोरे, किरण अवचिंदे, नीलेश गायकवाड, सुनील गुढेकर, जिजा गुढेकर, आकाश गायकवाड, राहुल उमप, लहू मोघे, संदीप साबळे, आकाश ढगे, ज्ञानेश्वर साळवे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. सपोनि नीलेश शेळके यांना निवेदन देण्यात आले. बिडकीन पोलिस ठाण्यात सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Source link
पोलिसांना निवेदन सादर:बिडकीनला सकल मातंग समाजाच्या वतीने मूकमोर्चा, आक्षेपार्ह वक्तव्याचा केला निषेध