![]()
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नवा इतिहास रचला गेला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. अर्चना कणसे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अलिकडेच एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विहित मुदतीत अर्चना कणसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात महिलांचे वाढते नेतृत्व आजवर पुरुषांचे वर्चस्व असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या आता एका सक्षम महिला नेतृत्वाच्या हाती गेल्या आहेत. अर्चना कणसे यांच्या बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्रात महिलांना मोठे प्रतिनिधित्व आणि सन्मान मिळाला असल्याची भावना शेतकरी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. निवडीची घोषणा होताच बाजार समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी महाविकास आघाडी, युतीचे प्रमुख नेते, बाजार समितीचे सभापती, सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. कष्टकऱ्यांचा विजय “हा केवळ माझा एकटीचा सन्मान नसून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि महिला शक्तीचा विजय आहे. सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याला माझे पहिले प्राधान्य असेल असे अर्चना कणसे यांनी बोलताना सांगितले.
Source link
कृउबासच्या उपसभापतिपदी अर्चना कणसे बिनविरोध:सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड