Headlines

सालोरा येथे ‘कृषी’ विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण:शेतकऱ्यांमध्ये जागृती, गावोगावी जाऊन शाश्वत शेतीवर मार्गदर्शन‎‎




अकोला महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी सालोरा बु. येथे वृक्षारोपण करत शेतकरी जनजागृतीचा उपक्रम राबवला. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी विविध गावांमध्ये जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करत आहेत. सालोरा बु. येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला सरपंच महेश दिवाण, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण, शाश्वत शेती पद्धती व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेशही दिला. या महत्त्वपूर्ण उपक्रमात वेद चिंचमलातपुरे, सागर खैरे, समीर काशीवार, अनुराग इंगळे, अथर्व जयस्वाल, दीपक बडवाईक, वेदांत घुगरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथील डॉ. सतीश निचळ, डॉ. हेमंत डिके, डॉ. घावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सरपंच व ग्रामस्थ यांनी सर्वांचे भरभरून कौतुक केले. शेतकऱ्यांना पीक संरक्षण, शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *