![]()
दर २० वर्षांनी राबवल्या जाणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सध्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले गणना प्रपत्र बीएलओ किंवा बीएलए यांच्याकडे भरून देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी पत्रकार परिषदेत केले. तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार महेश नागोलकर उपस्थित होते. यापूर्वी हा कार्यक्रम २००२ मध्ये राबवला होता. मतदार यादी अद्ययावत झाल्यानंतर कोणाचेही नाव दोन ठिकाणी राहणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. २००२ च्या मतदारयादीनुसार नावे असल्यास कुठलाही पुरावा देण्याची गरज नाही. मात्र, ज्यांचा जन्म १९८७ पूर्वीचा आहे, त्यांना जन्माचा पुरावा द्यावा लागेल. मतदारसंघातील जवळपास ९० टक्के लोकांची मॅपिंग पूर्ण झाली आहे. उर्वरित ५ टक्के लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (८), बीएलओ पर्यवेक्षक (३९), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (३९०) आणि बूथ लेव्हल एजंट (११२९) आहेत. आकडेवारी एका नजरेत एकूण मतदार : २,९७,१२४ एकूण मतदान केंद्र : ३९० मूर्तिजापूर : ग्रामीण (१५२), शहर (४४) बार्शीटाकळी : ग्रामीण (१३६), शहर (२१) अकोला ग्रामीण : ३७ केंद्र
Source link
मूर्तिजापुरात ‘एसआयआर'चे काम सुरू:नागरिकांनी प्रपत्र भरावे; एसडीएम संदीप कुमार अपार यांचे आवाहन