Headlines

लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलावर खड्डे, पाणी तुंबल्यामुळे अपघाताचा धोका:शिवना नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटले, तात्काळ दुरुस्तीची मागणी‎



लासूरगाव (ता. वैजापूर) येथील शिवना नदीवरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलावर पडलेले खड्डे आणि तुटलेले लोखंडी कठडे यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शिवना नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून गेल्याने पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाल

.

शिवना नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी या पुलाची व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी लासूरगावचे तातेराव गोंडे यांनी केली.

या रस्त्यावरून अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. समृद्धीला जोडणारा रस्ता असूनही प्रशासनाला जाग का येत नाही, असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत. अपघाताचा मोठा धोका टाळण्यासाठी लासूर स्टेशन ते वैजापूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. पुलाचे कठडे तातडीने बसवण्याची मागणी आहे.

समृद्धी इंटरचेंजमुळे वाहतुकीची प्रचंड वर्दळ हडसपिंपळगावजवळ समृद्धी महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा इंटरचेंज आहे. त्यामुळे एएस क्लबपासून सोलापूर-धुळे मार्गावरील वाहतूक लासूर स्टेशनमार्गे हडसपिंपळगाव इंटरचेंजवरून मुंबईकडे जाते. याशिवाय लासूरगाव, हडसपिंपळगाव, बोरदहेगाव, गोलवाडी, वैजापूर ते शिर्डी मार्गाला जोडणाऱ्या या जुन्या नागपूर-मुंबई महामार्गावर वाहनांची अहोरात्र मोठी वर्दळ असते. मात्र, लासूर स्टेशनपासून करोडी फाट्यापर्यंत आणि वैजापूरपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *