![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी अभिवादनासाठी स्मारक परिसरात दाखल होऊ लागले आहेत. विविध भागांतून अनुयायांचे लोंढे स्मारक परिसरात येताना दिसत असून, संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणा घुमत आहेत. यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावत बाबासाहेबांना अभिवादन केले. यंदाच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील स्मारकासमोर विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटवर काही ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा, असा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जयंती उत्सवाला वेगळे स्वरूप मिळाले आहे. अनेक अनुयायी आणि नागरिक या ठिकाणी फोटो काढत असून, सोशल मीडियावरही या उपक्रमाची चर्चा रंगत आहे. या संबंधीचे लाईव्ह अपडेट्स…..
Source link
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी:राजकीय नेतेही हजर; जय भीमच्या घोषणा