![]()
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची गती वाढली असतानाच आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर मोठा दावा केला आहे. त्यांच्या नावावर दाखवण्यात आलेली सर्व खाती बनावट असून, त्या खात्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या खरात प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची भर पडली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंधारे यांनी म्हटले की, आम्ही एसआयटीला भेटायला गेलो असताना संपूर्ण परिसर बंद करण्यात आला होता. पत्रकारांनाही प्रवेश नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना अशी विशेष वागणूक का देण्यात आली? असा थेट सवाल त्यांनी केला. या वक्तव्यामुळे तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय सुषमा अंधारे यांनी सहा ठोस प्रश्न उपस्थित करत तपास यंत्रणांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी विचारले की, अंजली दमानिया यांच्या सीडीआरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे असल्याचे म्हटले असेल, तर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? जर दमानिया बरोबर असतील, तर चाकणकर भगिनींना विशेष वागणूक का दिली जाते? तसेच पोलिस चौकशी करत होते की काही संदेश देत होते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. खरात आणि चाकणकर यांच्यातील कॉल आणि व्यवहारांची माहिती समोर येत असताना अजूनही ठोस कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अंधारेंनी पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांनाही या प्रकरणात चौकशीसाठी कधी बोलावले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला. कोण कुणाला फसवत आहे? असा थेट सवाल करत त्यांनी या प्रकरणातील सूत्रधारावरून पडदा उघडण्याची मागणी केली. अंधारे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता.
मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय… १. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही? २. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ? ३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? ४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? ५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? ६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ? _ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे… !
Source link
प्रतिभा चाकणकरांचे बनावट खात्याचा दावा आणि अंधारेंचे 6 थेट सवाल:2 कोटींचे व्यवहार, बनावट खाती की राजकीय संरक्षण?