Headlines

जवळगावात ‘श्रीवर्धन प्रीमियर लीग हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा:श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्याकडून आयोजन‎




वैराग जवळगाव आत्मोन्नती फाउंडेशनच्या वतीने ‘ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्रीवर्धन प्रीमियर लीग २०२६’ अंतर्गत भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा.विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर) श्रीवर्धन शुगरचे कार्यकारी संचालक औदुंबर दत्तात्रय डिसले, उद्योजक स्वप्निल डिसले यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ५१, हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३१, हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांसाठीही पाच ते एकरा रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच खेळाडूंनी ओळखपत्र बंधनकारक ठेवण्यात आले आहे. अंतिम निर्णय पंचांचा राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा जवळगाव येथील काटी रोडवरील श्रीवर्धन शुगर्स परिसरात रंगणार असून, परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मोठा क्रीडा सोहळा ठरणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीवर्धन शुगर्स चे महादेव डिसले, सुमंत डिसले, सौरभ कापसे, किरण कापसे , बापू कापसे चंद्रकांत डिसले, एकदंत क्रिकेट क्लब व आत्मोन्नती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *