Headlines

नेरपिंगळाईत सहकार सप्ताहानिमित्त महिला प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम:गोदाम व्यवस्थापन, सहकाराचे महत्त्व यावर मार्गदर्शन




नेरपिंगळाई येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सहकार सप्ताहानिमित्त महिला प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला, शेतकरी, सभासद तसेच सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नागपूर येथील धनंजय गाडगीळ सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या प्राचार्य सीमा मिश्रा आणि मोर्शीच्या सहायक निबंधक स्वाती गुडधे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्य मिश्रा यांनी उपस्थितांना गोदाम व्यवस्थापन, साठवणुकीचे महत्त्व आणि त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक गोदाम व्यवस्थापन, शेतीमालाची योग्य साठवण, गुणवत्ता संवर्धन आणि शेतकऱ्यांना होणारे आर्थिक लाभ याबद्दल माहिती दिली. सहायक निबंधक स्वाती गुडधे यांनी सहकाराचे महत्त्व, सहकार चळवळीची भूमिका आणि सामान्य नागरिकांच्या जीवनातील सहकाराचे स्थान यावर मार्गदर्शन केले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी इफको (IFFCO) आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ५० शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक निविष्ठा (किट) मोफत वितरित करण्यात आल्या. तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपणही करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *