![]()
तहसील कार्यालयात सुनावणीची तारीख देऊनही तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी वेळेवर दालनात हजर नसल्याने एका संतप्त तरुणाने थेट कार्यालयातच नोटीस भिरकावून अनोखे आंदोलन केले. मंगळवारी फुलंब्री येथील तहसीलदार योगिता खटावकर यांच्या दालनात शेत रस्ता, बांधाचे वाद आणि अतिक्रमण अशा विविध प्रकरणांची सुनावणी नियोजित होती. या सुनावणीसाठी अनेक पक्षकार वेळेत हजर झाले होते. मात्र, तहसीलदार हजर नसल्याने नेहमीप्रमाणे सर्व प्रकरणांची तारीख पुढे ढकलण्यात आली. अधिकारी गैरहजर राहत असल्याने केवळ तारखांवर तारखा दिल्या जातात. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाऊन नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून अखेर तळेगाव येथील एका संतप्त युवकाने तहसील कार्यालयातच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने प्रशासकीय अनास्थेचा निषेध करत हातातील नोटीस थेट कार्यालयात भिरकावून दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त होत आहे. निवडणुक कामांसदर्भातील बैठकीमुळे सुनावणी स्थगित Ãफुलंब्री येथील तहसीलदार यांना निवडणुक कामासंदर्भात महत्वाची बैठक असल्यामुळे त्या सुनावणी घेऊ शकल्या नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. – संजीव राऊत, नायब तहसीलदार, फुलंब्री तहसील कार्यालय
Source link
फुलंब्रीमध्ये नोटीस भिरकावत आंदोलन:सुनावणीची तारीख देऊनही तहसीलदार गैरहजर राहिल्याचा तरुणाचा आरोप