Headlines

कैद्याच्या नियमित झडतीत गांजा सापडला:येरवडा कारागृहात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल




न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर गेलेला एक कैदी परत येत असताना त्याच्याकडे गांजा सापडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कैद्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय 21, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील रक्षक समाधान हत्तीकर यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहालसिंग हा सराईत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध घरफोडी आणि लूटमार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने हडपसर परिसरात एका सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार केला होता. सहायक निरीक्षकाच्या खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कामकाजासाठी त्याला कारागृहातून बाहेर नेण्यात आले होते. कामकाज संपल्यानंतर तो येरवडा कारागृहात परतला. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कैद्यांची नियमित झडती घेतली जाते. या झडतीदरम्यान त्याच्याकडे 12 ग्रॅम गांजा सापडला, ज्याची किंमत सुमारे 500 रुपये आहे. या घटनेची माहिती तात्काळ येरवडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी कारागृहास भेट देऊन घटनेची पाहणी केली. निहालसिंगविरुद्ध आता अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला ओएलएक्स ॲपवर टेबल खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला बनावट क्यूआर कोड व बँक खात्याची माहिती पाठवून 4 लाख 81 हजार 430 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेधारक व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश मारुती डांगमाळी (वय 41, रा. ग्रीनव्हिले सोसायटी, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश डांगमाळी यांनी ओएलएक्स ॲपवर विक्रीसाठी टेबलची जाहिरात दिली होती. ती पाहून आरोपीने टेबल खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलवर विविध बँकांचे क्यूआर कोड पाठवून बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहारांद्वारे 4 लाख 81 हजार 430 रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *