Headlines

राज्यात पक्क्या नोकऱ्यांऐवजी चहा अन् पानटपऱ्यांवर गुजराण:एनएसओच्या अहवालातून वास्तव आले समोर, सुशिक्षित बेरोजगार मजबुरीच्या गर्तेत



महाराष्ट्रात रोजगाराचे आकडे वाढल्याचे ढोल सरकारकडून पिटले जातात. पण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात एनएसओच्या अहवालाने या दाव्यांचे धिंडवडे काढले आहेत. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचा वार्षिक अहवाल-२०२५ नुसार, राज्यातील तरुणांच्या उपजीविकेचे पर्या

.

देशात अशा प्रकारच्या ७.९२ कोटी तर महाराष्ट्रात ६५.६५ लाख असंघटित आस्थापना आहेत. यात अनुक्रमे देशात १२.८१ कोटी तर राज्यात १.१७ कोटी लोक येथे काम करतात. असंघटित क्षेत्रात रोजगार देण्यात महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी आहे. कॉर्पोरेट वा औद्योगिक क्षेत्राप्रमाणे सन्मानजनक वेतन, पीएफ, वैद्यकीय विमा येथे मिळत नसते. ती केवळ जगण्यासाठी केलेली धडपड ठरते.

युवकांना मिळतात दरमहा १२ हजार रु.

असंघटित क्षेत्रात ९०% व्यावसायिक स्वतःच कामगार आहेत. ३७% दुकाने घरात, ३८% घराबाहेर पक्क्या जागेवर, २.३% घराबाहेर कच्च्या जागेवर, ३.४% उघड्यावर, २.४% फेरीवाले तर १०.५% रस्त्यालगत आहेत. उत्पादन क्षेत्रातील कामगारांची वर्षाची कमाई १.४० लाख, व्यापार क्षेत्रातील १.४४ लाख तर सेवा क्षेत्राची कमाई १.५१ लाख रुपये आहे. दरमहा कमाई ११ ते १२ हजार आहे. रु.२,१४,२३७ वेतनासह वार्षिक वेतनात उत्तराखंड देशात अव्वल. महाराष्ट्र पहिल्या तीन राज्यांतही नाही.

महिलांच्या रोजगारातही महाराष्ट्र यूपी, बंगालच्या मागे

१- उत्पादन : २.१३ कोटी क्षेत्र व्यवसाय % कामगार% पानटपरी २३.८३ २८.०३ टेलरिंग दुकान २४.८६ २७.८६ कापड दुकान ९२.५० ६८.६६ अन्य ७३.१८ ९१.३१

२-सेवा : ३.३२ कोटी हॉटेल ३८.०९ ५४.४८ वाहतूक ७४.६० ५०.५२ सलून,प्लंबिंग ९१.८७ ७५.३१० पेस्ट कंट्रोल १३१ १३२ ३-विक्री : २.४५ कोटी रिटेल २०९ २१८ होलसेल १४.५७ २२.८० अन्य १७.८२ २२.०९ (सर्व आकडे लाख रूपयांत आहेत)

लाडक्या बहिणींना चपराक

देशातील असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या सहभागात महाराष्ट्राचा वाटा ९.५३% आहे. सर्वाधिक महिला प. बंगाल-१२.१८% तर उत्तर प्रदेशात ११.२८% महिला काम करतात.

एकूण रोजगार देश-१२.८१ कोटी, महाराष्ट्र- १.१७ कोटी महिला भागीदारी देश- २९%, महाराष्ट्र ९.५३% एकूण व्यवसाय: देश- ७.९२ कोटी, महाराष्ट्र-६५.६५ लाख



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *